महाशिवरात्रीला सोमेश्वर मंदिर राहणार बंद : बारामतीचे तहसीलदार यांचे आदेश
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
कोव्हीड १९ विषाणुचा प्रादुर्भाव रोखणेसाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांच्या अनुषंगाने सोमेश्वर करंजे ता.बारामती येथील सोमेश्वर मंदिर दि.११ रोजी
महाशिवरात्र निमित्त भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे.
याबाबत वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दि ५ रोजी तहसील कार्यालयाला याबाबत पत्र पाठवले होते. बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांनी काढलेल्या आदेशात म्हनटले आहे की, कोरोना विषाणुमुळे उदभवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणुन घोषित केले आहे.
आणि ज्या अर्थी मौजे सोमेश्वर करंजे ता.बारामती जि.पुणे येथील सोमेश्वर मंदिर हे महाराष्ट्र शासन पर्यटन विभाग, ब वर्ग दर्जाचे तिर्थक्षेत्र असणारे सोमेश्वर मंदिर येथे दरवर्षी महाशिवरात्री दिवशी संपुर्ण महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहुन भाविक भक्त देवदर्शनाकरिता येत असतात व तेथे भाविकांची गर्दी होत असते तसेच दि.११/०३/२०२१ रोजी महाशिवरात्री असल्यामुळे सदर ठिकाणी त्या दिवशी अंदाजे २५ ते ३५ हजार भाविक येण्याची शक्यता असल्यामुळे कोरोना विषाणुचा प्रसार गर्दीमुळे वाढु नये या दृष्टीने सोमेश्वर मंदिर दि.११/०३/२०२१ रोजी भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवणे आवश्यक आहे असे आदेशात म्हनटले आहे
COMMENTS