भोर मधील भाजपा नेते प्रदिप खोपडे यांचा शिवसेनेत प्रवेश
भोर : प्रतिनिधी
मुंबई कृषि उत्पन्ना बाजार समितीचे माजी संचालक व भारतीय जनता पार्टीचे भोर तालुक्यातील नेते प्रदिप खोपडे यांनी शिवसेना भवन मुंबई येथे शिवसेना सचिव व खासदार अनिल देसाई यांच्याप्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला असून भोर तालुक्यात शिवसेना पक्ष वाढवणार असल्याचे खोपडे यांनी सांगितले.
प्रदीप खोपडे यांनी पश्चिम महाराष्ट्र सहकार क्षेत्रात चांगले काम असुन मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये संचालक म्हणुन काम केले आहे तसेच भोर तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक आहेत. मागील चार वर्षापासुन ते भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत होते पश्चिम महाराष्ट्रातील सहकाराच्या प्रश्नाबाबत शिवसेना पक्षाकडुनच मार्ग निघु शकेल याचा विश्वास वाटल्याने त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गर्दी न करता ३० कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे.
मंगळवार दि. २ मार्च रोजी गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर मुंबई दादर येथे शिवसेना भवनात शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई यांनी त्यांना शिवबंधन बांधुन त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. यावेळी शिवसेना उपनेते विभागीय समन्वयक माजी आमदार रविंद्र मिर्लेकर, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सत्यवान उभे, भोर उपतालुकाप्रमुख हनुमंत कंक, विजुकाका जेधे आदी उपस्थित होते. प्रवेशानंतर माहीती देताना प्रदिप खोपडे यांनी सांगितले कि, मला सहकारा मधील माहीती व काम करण्याची आवड आहे सहकारातील प्रश्ना बाबत शिवसेना पक्ष योग्य न्याय देऊ शकतो याची खात्री पटल्याने सर्व सहकारयां बरोबर चर्चा करुन प्रथम काही निवडक कार्यकर्त्यांसह आज शिवसेनेत प्रवेश केला असुन शिवसेनेची ध्येय धोरणे लक्षात सहकारात पक्षाचे बळ वाढवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे
COMMENTS