'सोमेश्वर' ने बंद केलेल्या खोडवा उसाच्या नोंदी सुरू कराव्यात : दिलीप खैरे
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज--------
सोमेश्वर कारखान्याने दि १ मार्च पासून ऊस खोडवा उसाच्या नोंदी बंद केल्यामुळे सभासद अडचणीत येणार आहे. त्यामुळे कारखान्याने त्वरित या खोडवा उसाच्या नोंदी सुरू कराव्यात अशी मागणी भाजपचे नेते दिलीप खैरे यांच्यासह भाजप शिष्टमंडळाने केली आहे.
याबाबत या शिष्टमंडळाने सोमेश्वर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नुकताच आपल्या कारखान्याने सभासदांच्या खोडवा ऊसाच्या नोंदी दि १ मार्च पासून न घेणेबाबतचा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला असून सदर निर्णयामुळे कारखान्याचे सभासद अडचणीत येणार आहेत. सभासदांचे ऊसाचे गाळप करणे ही प्रशासनाची जबाबदारी असून सभासदांनी २०१८
मध्ये विस्तारीकरणास मंजूरी दिलेली आहे. तरी खोडव्याची नोंद घेतली नाही तर पुढील हंगामात शेतकरी बेणे विकत घेवू शकणार नाहीत आणि त्यांना ते परवडणार नाही याची कृपया नोंद घेवून खोडवा नोंदी
पुर्ववत सुरु कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप खैरे, सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक पी के जगताप, निरेचे माजी उपसरपंच बाळासाहेब भोसले, खलील काझी, विठ्ठलराव पिसाळ, शंकरराव दडस, आदिनाथ सोरटे आदी मान्यवर उपस्थित होते.
COMMENTS