सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील करंजेपुल (गायकवाडमळा) येथे उसाने भरलेली ट्रॉली स्कार्पियो वर पलटी झाल्याने तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
आज रात्री पाऊनेनऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. प्रथमदर्शनी पाहणारांनी सांगितले की सोमेश्वर मंदिराकडून उसाने भरलेले दोन ट्रॅक्टर सोमेश्वर कारखान्याच्या दिशेने निघाले होते. या दोन ट्रॅक्टर मध्ये रेस लागल्याचे समजत आहे. याच वेळी वाकी (पांढरवस्ती) येथील स्कार्पियो सोमेश्वर कारखान्याकडून वकिच्या दिशेने निघाली होती. याचवेळी गायकवाड मळा येथे स्कार्पियोवर उसाने भरलेली ट्रॉली पलटी होऊन तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना वाघळवाडी येथील साईसेवा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.
COMMENTS