अजितदादांच्या सूचना.....अनं अवघ्या १२ तासाच्या आत बारामतीत उभं राहीलं तब्बल १७५ बेडचं कोविड सेंटर !

Admin
बारामती : प्रतिनिधी

 आतापर्यंत आपण सर्व प्रकारच्या शासकीय कामाच्या यंत्रणा पाहिल्या आहेत. कोणताही कामं करायचं म्हटलं की त्याची पाहणी, बजेट, मंजुरी मग निधी व त्यांनतर मुदतीत कामं… परंतू बारामती हे एक असं शहर झालंय की जिथं सकाळी नेत्याचा शब्द तोंडातून पडतो आणि कार्येकर्ते संध्याकाळी ते कामं पूर्णत्वास नेतात. हो… हे खरं आहे कोरोनाचा एक ही पेशंट बेडशिवाय राहता कामा नये हे धोरणं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आहे. आणि दादांच्या शब्दाला कामातून अंजाम दिलाय जेष्ठ नगरसेवक किरण गुजर आणि त्यांची टीमने....
बारामती तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी बारामतीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी दवाखान्याची निर्मिती झपाट्याने चालू आहे. गेल्या आठ दिवसात तीन कोविड सेंटर ची निर्मिती करून.. बारामतीकरांनी जणू काय कोरोनालाच आव्हानं दिलं आहे. आज सकाळी अजित पवार यांनी तुळजारम चतूरचंद महाविद्यालयात कोविड सेंटर उभा कारण्याबात चर्चाकरून कामं करण्याचे आदेश देताचं.. जेष्ठ नगरसेवक किरण गुजर , उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव इतर कार्यकर्त्यानी टी. सी. कॉलेज चे मुलींचे वसतिगृह ताब्यात घेऊन संध्याकाळ पर्यंत तब्बल 175 बेड्चे कोविड सेंटर तयार केले आहे.
To Top