सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

सोमेश्वरनगर परिसरातील पहिल्या कोविड सेंटर चा शुभारंभ: रामराजे जगताप सोसायटीचा पुढाकार

सोमेश्वर रिपोर्टर न्युज-----

वाणेवाडी (ता.बारामती) येथे रामराजे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी व ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने आज कोविड केअर सेंटरची सुरुवात करण्यात आली. रामराजे कार्यालयातील या सेंटरचे उद्घाटन बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व तालुक्याच्या सभापती नीता फरांदे यांच्या हस्ते संपन्न झाले.
          सोमेश्वरनगर परिसरामध्ये कोविड सेंटर सुरू व्हावे अशी नागरिकांची मागील महिन्यापासून मागणी होत होती. यास अनुसरून सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप यांनी पुढाकार घेत त्यांच्या रामराजे सोसायटीच्या वतीने रामराजे मंगल कार्यालय  सेंटर साठी सुपूर्द केले. वाणेवाडी व परिसरातील लोकांनी लोकसहभागातून भोजन, स्वच्छता, कर्मचारी आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या. कार्यालयाचे भोजनगृह, शौचालय गृह उपयोगी पडणार आहे. या सेंटरमध्ये ५० बेडची सुविधा करण्यात आली असून ३५  पुरुषांसाठी तर १५ स्त्रियांसाठी असतील. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग औषध पुरवठा व कर्मचारी पुरवठा करणार आहे. या ठिकाणी एक ऍम्ब्युलन्स अचानकच या सेवेसाठी ठेवली जाणार आहे. लोकसहभागातून उभ्या राहिलेल्या केअर सेंटरची इतर ठिकाणाहून हे अनुकरण व्हावे अशी अपेक्षा प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी व्यक्त केली. तसेच गृह विलगीकरण कक्षात लोकांनी राहू नये त्याऐवजी केअर सेंटरमध्ये यावे असेही आवाहन त्यांनी केले. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी, शासनाच्या आदेशानुसार गृह विलगीकरण  असूनही फिरणाऱ्या लोकांवर कारवाई केली जाईल असे सांगितले तर डॉ. मनोज खोमणे यांनी, गृह विलगिकरणात राहूच नये त्याऐवजी सेंटरला भरती व्हावे विलगीकरणातील लोक सुपर स्प्रेडर चे काम करत आहेत असेही ते म्हणाले. याप्रसंगी राष्ट्रवादीची तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, दूध संघाचे संचालक कौस्तुभ चव्हाण, सोमेश्वर चे संचालक किशोर भोसले, रामराजे सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब जगताप, उद्योजक राजेंद्र जगताप,  किरण काकडे, उपसरपंच संजय जगताप, वानेवाडी चे माजी सरपंच दिग्विजय जगताप, हरिश्चंद्र जगताप, कल्याण जगताप, रोहिदास जगताप, ग्रामसेवक पी के गाढवे, विजय जगताप, राजू बडदे, किरण जगताप आदी मान्यवर उपस्थित होते

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7050,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : सोमेश्वरनगर परिसरातील पहिल्या कोविड सेंटर चा शुभारंभ: रामराजे जगताप सोसायटीचा पुढाकार
सोमेश्वरनगर परिसरातील पहिल्या कोविड सेंटर चा शुभारंभ: रामराजे जगताप सोसायटीचा पुढाकार
https://lh3.googleusercontent.com/-d1X7VN6yoDc/YJvotVv9zKI/AAAAAAAAKEg/XmGjhdb0xvY9Xo_SnbZDAfhpH3e_S0FxgCLcBGAsYHQ/s1600/1620830387163535-0.png
https://lh3.googleusercontent.com/-d1X7VN6yoDc/YJvotVv9zKI/AAAAAAAAKEg/XmGjhdb0xvY9Xo_SnbZDAfhpH3e_S0FxgCLcBGAsYHQ/s72-c/1620830387163535-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2021/05/blog-post_12.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2021/05/blog-post_12.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy