सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
ऑनलाइन लसीकरणाचा सर्वत्र बोजवारा उडाला असताना शहरातील आय टी क्षेत्रातील तरुण घरात बसून ग्रामीण भागातील लसीकरणाचे ऑनलाइन बुकिंग करत होते, यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना लसीपासून वंचित राहावे लागत होते. यावर सोमेश्वर रिपोर्टर ने आवाज उठवला होता. त्यामुळे आरोग्य विभागाकडून १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणास तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे.
याबाबत बारामती आरोग्य विबजागच्या वतीने सांगण्यात आले आहे की, उद्या बारामती तालुक्यामध्ये सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये, ग्रामीण रुग्णालय सुपे व बारामती शहरामध्ये महिला हॉस्पिटल बारामती व इतर तीन ठिकाणी ४६ वर्षावरील व्यक्तींचे ज्यांचा दुसरा डोस (कोविशिल्ड) प्रलंबित आहे अशाच व्यक्तींना लसीकरण केले जाईल, पहिल्या डोसच्या लाभार्थ्यांनी गर्दी करू नये ही विनंती तसेच १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण मोहिमेस शासनाने तूर्त स्थगिती दिलेली आहे याची नोंद घ्यावी. असे कळविण्यात आले आहे.
COMMENTS