सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सचिन पवार
बारामती तालुक्यातील सुपे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुचनेनुसार ६० बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले असुन यासाठी शासन व येथील ग्रामपंचायती मिळून याचे सहभागातुन हे कोविड सेंटर सुरू असुन रूग्णांच्या देखभालीचीही काळजी येथे चांगल्या प्रकारे होत आहे ,
येथील रूग्णांना पोष्टीक आहारही या काळात देणे महत्वाचे असते याचीच गरज ओळखुन येथे कोविड सेंटरला कार्य करणाऱ्या राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष अनिल हिरवे यांच्या मित्र परिवारामार्फत सात्विक व पोष्टीक आहारामध्ये खजुराचे २५२ पॅकीटचे वाटप करण्यात आले आहे ,
चांगल्या आरोग्यासाठी गोड फळेही तितकीच महत्वाची आहेत. सुका मेव्यातील खजूर हे खूप चांगले फळ आहे.खजूर तसेच खारीक खल्ल्याने त्याचे खूप फायदे आहेत. खजूर हे अंत्यत पौष्टिक खाद्य आहे. खजूर खाल्याने अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो. यामुळे शरीराला ताकद मिळते तसेच शरिराचा लवकर विकास होतो. जास्त शुगर क्रेव्हिंग त्यांच्यासाठीही खजूर उत्तम पर्याय ठरू शकतो.ऊर्जा मिळते - खजुरात व्हिटॅमिन ए, बी १, बी२, बी ३,बी ५ आणि विटॅमिन सी असते. खजूर खाल्ल्याने ऊर्जा मिळते. तसेच थकवा दूर होतो. खजूर खाल्ल्यानंतर काही दिवसांतच फायदा व्हायला लागतो. अनेक आजार खजूर खाल्याने आपण टाळू शकताे अशी माहिती यावेळी येथील वैद्यकिय अधिकारी डॉ - चाफकानडे यांनी दिली , तसेच परिसरातील युवकांनी या याचा आदर्श घेऊन योगदानाचे कार्य करावे असे उद्गार ज्ञानेश्वर यांनी काढले ,
याप्रसंगी वैद्यकीय अधिक्षक डॉ -चाफाकानडे,माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कौले , मा.उपसरपंच शफीक बागवान , राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्ष अनिल हिरवे , उद्योजक अभिनव कुतवळ , अमोल बारवकर , डॉ जयदीप चांदगुडे , पत्रकार सुदाम नेवसे , अरोग्यसेवक जमिर इनामदार ,समता परिषद तालुका अध्यक्ष सचिन भुजबळ ,राजकुमार लव्हे , जमीर तांबोळी , श्रीकांत खैरे , युवा कर्यकर्ते रोहन सरोदे , सुयश जगताप , अमर होले , कल्पेश जगताप , राहुल जाधव , अलताप इनामदार , येथील वैद्यकिय कर्मचारी स्टाप सह अनिल हिरवे मित्र परिवार व निसर्ग स्पर्श फांऊडेशनचे, सुपा वॉरिअर्सचे कार्यकर्ते उपस्थित होते.
COMMENTS