सुखद वार्ता..! सोमेश्वर रिपोर्टर ची बातमी वाचून सिंगापूर देशातून सुपेच्या कोविड सेंटरला १० हजाराची मदत

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सचिन पवार

बारामती तालुक्यातील सुपे येथे उपमुख्यत्र्यांचा सुचनेनुसार  कोविड सुरू झाले असुन गेल्या पंधारा दिवसापासुन येथील व्यवस्था नियोजन बद्ध व चांगल्या प्रकारे सुरू आहे हे सर्व कामकाज पाहता परदेशात सिंगापुर येथे कार्यरत असणाऱ्या युवकाने सुपे कोविड सेंटर मदत केली आहे ,
   आज सकाळी सुपे येथील राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अनिल हिरवे मित्र परिवारामार्फत रूग्णांना खजुर वाटपाचा कार्यक्रम पार पडला. 
 त्याची बातमी सोमेश्वर रिपोर्टर ने प्रसिद्ध केली होती.  या बातमीचा वॉटसप स्टेटस सुपे येथील अनेक युवक वर्गानी आपल्या वॉटसप सोशल मिडियावर ठेवला असता , सुपे येथील सचिन ( रामा ) बारवकर या युवकांने वॉटसप  स्टेटस वर ठेवले होते , तसेच तो दररोज कोविड सेंटर सुपेची माहिती सोशल मिडियावर पाठवत असतो, कोविंड सेंटरचे काम चांगल्या प्रकारे सुरू असल्याचे पाहता त्याचा मित्र नाव जावेद सय्यद, मुळगाव अहमदनगर तो सद्या नोकरी निम्मीत सध्या सिगांपुर येथे कार्यरत असुन त्यांनी सुपे कोविड सेटंरचे काम पाहुन मदत करण्याची ईच्छा व्यक्त केली. व काही वेळातच आपल्या ऑनलाईन बॅकिंग माध्यमातुन त्यांनी दहा हजार रूपायाची तातडीने मदत पाठवली , व आणखी काही मदत लागल्यास नक्की कळवा असे आश्वासन दिले , सुपे कोविंड सेंटरचे अनिल हिरवे यांनी त्यांना फोन वर बोलणे करत त्यांचे सुपे कोविंड सेंटऱ , ग्रामपंचायत सुपे व राष्ट्रवादी युवक कॉग्रेस बारामती यांस वतीने आभार मानले , तसेच वेळोवेळी बातमीसाठी तत्पर असणाऱ्या सोमेश्वर रिपोटर वेब पोर्टल चे देखिल आभार मानले ,
To Top