विद्या प्रतिष्ठाणच्या सोमेश्वर इंग्लिश स्कुल मध्ये ७५ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----

सोमेश्वरनगर येथील विद्या प्रतिष्ठानच्या सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल सीबीएसई ,सोमेश्वर मध्ये ७५ स्वातंत्र्य दिन  उत्साहात साजरा करण्यात आला.
          शाळेतील प्राथमिक विभागातील सेवाज्येष्ठ शिक्षिका सौ. वर्षदा जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले शिक्षकांनी राष्ट्रगीत व ध्वजगीताचे गायन केले. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभावना जागृत करण्यासाठी ऑनलाइन विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
           या प्रसंगी शाळेचे प्राचार्य श्री. सचिन पाठक, शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या स्वातंत्र्य उत्सवाच्या कार्यक्रमात कोविडच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले.
To Top