सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतराव पिसाळ
मल्हारपेठ ता.पाटण येथील माहेरवाशीन असलेल्या आणी वेणेगाव ता. सातारा येथील सासरवाशीन व संताजी घोरपडे यांच्या पत्नी शुभांगी संताजी घोरपडे सध्या राहणार दहिसर वेस्ट (मुंबई ) यांचे वयाच्या ४२ व्या वर्षी ह्रदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाल्याने मल्हारपेठ येथील चव्हाण कुटुंबासह वेणेगाव येथील घोरपडे कुटुंबा वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
तरुण वयातच निधन झाल्याची बातमी वेणेगाव ता. सातारा येथे वार्यासारखी पसरल्याने आणी त्यांचा स्वभाव मनमिळाऊ संयमशील येणार्या प्रत्येक संकटांना सहज सामोरे जाण्याची जिद्द असणार्या अशी त्यांची वेगळी ओळख होती अशा या गृहिणी असणार्या शुभांगी ताई वर काळाने झडप घातल्याने पती एक मुलगी लहान मुलगा हे आईच्या मायेपासुन पोरके आणी निराधार झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या वर वेणेगाव ता. सातारा येथील स्मशानभूमीत सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत .
COMMENTS