सोमेश्वर रिपोर्टर टीम---------
वाई : दौलतराव पिसाळ
ओझर्डे गावचे सुपुत्र रामचंद्र लक्ष्मण फरांदे यांची पोलिस उपनिरीक्षक या पदावर नेमणूक झाल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे .या अभिमानास्पद आणी गावाचा नावलौकिक वाढविल्या बद्दल त्यांच्या वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .त्यांच्या या यशा बद्दल ग्रामपंचायत सरपंच सर्व सदस्य गावातीत सर्व गणेश मंडळांनसह सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकत्यांनसह ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे .
सविस्तर वृत्त असे कि ओझर्डे ता.वाई येथील रहिवासी असलेले रामचंद्र लक्ष्मण फरांदे हे स्वकतृत्वाच्या जिद्द आणी चिकाटीच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण करण्या साठी ते १९८९ साली मुंबई पोलिस दलात कॉस्टेबल या पदावर भरती झाले होते तेथे त्यांनी निश कलंक सेवा बजावून अंगावर परिधान केलेल्या खाकी वर्दीला कोठेही गालबोट लागणार नाही याची काळजी घेत वरिष्ठ अधिकारी वर्गांची शाबासकी मिळवली होती . पुढे ते १९९५ साली घरच्या प्रापंचिक अडचणी असल्याने त्यांनी स्वताची बदली सातारा जिल्ह्यात करुन घेतली त्या वेळी त्यांनी सातारा
फलटण वाई खंडाळा बोरगाव अशा पोलिस ठाण्यात प्रामाणिक सेवा बजावली होती त्यांनी नोकरी करत असतानाच पोलिस उपनिरीक्षक या पदासाठी २०१३ साली परिक्षा दिली होती त्यात ते पास झाल्याने ओझर्डे गावाच्या नावलौकिकात भर घातल्याने त्यांचे गावातील सर्व थरातुन होत असलेल्या कौतुका बरोबर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .
COMMENTS