सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील निंबुत येथे अभिजीतभैय्या काकडे युवा मंच यांच्यावतीने पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
दि २४ रोजी सायंकाळी ५ वाजता या स्पर्धेला सुरुवात होणार आहे महाराष्ट्र राज्य शूटिंग बॉल चे उपाध्यक्ष तथा शिरोळ चे नगराध्यक्ष अमरसिंह भीमबहाद्दूर माने पाटील यांचे हस्ते उद्घाटन होणार असून जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते व जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे उपस्थित राहणार आहेत.
यामध्ये प्रथम ५१००१, द्वितीय ४१००१, तृतीय ३१००१, चतुर्थ २१००१, पाचवे ११००१, सहावे ५५५५, सातवे ४४४४, आठवे ३३३३, नववे २२२२ आणि दहावे ११११ बक्षीस ठेवण्यात आले आहे.
COMMENTS