सोमेश्वर रिपोर्टर टीम;-------
भोर : प्रतिनिधी
मागील वर्षीच्या अतिवृष्टीत भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील हिरडस मावळ खोऱ्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने एक मदतीचा हात म्हणून प्रत्येक गावाला सहा दिवस मोफत श्री मार्तंड देवस्थान जेजुरी यांनी जेसीबीच्या सहाय्याने दुरुस्ती केली जात आहे. परिसरातील दुर्गाडी,कुडली बुद्रुक येथील दुरुस्तीचे काम उरकले असून कुडली खुर्दमध्ये काम सुरू आहे.तर धानवली व कंकवाडी येथे पुढील आठ दिवसात दुरुस्तीचे काम सुरू होणार असल्याचे देवस्थानचे विश्वस्त सॉलिसिटर प्रसाद शिंदे यांनी सांगितले.जेजुरी देवस्थानच्या वतीने कायमच सामाजिक काम होत असते.तर सद्या मोफत शेती नुकसानीची दुरुस्ती केली जात असल्याने देवस्थानचे शेतकऱ्यांकडून अभिनंदन होता आहे.
COMMENTS