सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
करंजेपुल ता बारामती येथे सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषी गायकवाड मित्र मंडळाच्या वतीने भरवण्यात आलेल्या डायरेक्टर चषक क्रिकेट सामन्यात पणदरे येथील रणजित जगताप पाटील क्लब ने प्रथम पारितोषिक पटकावले.
करंजेपूल या ठिकाणी डायरेक्टर चषक २०२२ चे आयोजन ऋषी गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. या चषक मधे तब्बल ८० संघांनी सहभाग नोंदवला होता.या चषक का मधे श्री.सोमेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ आणि बारामती तालुका पत्रकार संघ यांच्या मधे मैत्री पुर्ण लढत झाली. या मधे पत्रकार संघाने पहिला विजय संपादन केला तसेच संचालक मंडळाने सुद्धा एक विजय आपल्या नावा वरती केला. दोन्ही संघांना सन्मान चिन्हं देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच या स्पर्ध मधे प्रथम क्रमांक व आकर्षक चषक रणजित जगताप पाटील क्रिकेट क्लब पणदरे, द्वितीय व आकर्षक चषक पै.रणवीर योगेश गायकवाड करंजेपुल,तृतीय क्रमांक व आकर्षक चषक सोनु सावंत क्रिकेट क्लब खंडोबाची वाडी, चतुर्थ क्रमांक व आकर्षक चषक शिवछत्रपती क्रिकेट क्लब शेंडकरवाडी यांनी पटकावला. चषक मधे असलेल्या विशेष मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी पंधरे संघाचा विपुल जगताप ठरला.
या चषक चा बक्षिस वितरण समारंभ शिवजयंती उत्सव करंजेपुल या ठिकाणी पार पडला. शिवजयंती उत्सवा निमित्त अमरावती चे श्री.सोपान कनेरकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या चषका साठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सागर गायकवाड व धीरज गायकवाड,द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक विजयेंद्र शिंदे व पपु कोलते, तृतीय पारितोषिक सुहास गायकवाड व हरिष गायकवाड,चतुर्थ पारितोषिक कुणाल गायकवाड व मॅन ऑफ द सिरीज पारितोषीक रेसिंग सायकल अक्षय गायकवाड व दिग्विजय मगर यांनी दिली.
सदर स्पर्धेचे यशस्वी रित्या आयोजन ऋषी गायकवाड मित्र परिवाराच्या व करंजेपुल ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले.
COMMENTS