सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : प्रतिनिधी
भोर येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका पोलिसांने ५ बाटल्या बियरच्या व ५ हजार रूपये मागितल्याचे सांगून हॉटेल मालकाची फसवणूक करून दमदाटी करीत खंडणी मागितल्या प्रकरणी रवी पांडुरंग खोपडे रा.आंबेघर ता.भोर याचे तीन जणांवर भोर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.याची फिर्याद आपटी येथील हॉटेल चालक आरिफ मान्नान शेख याने दिली आहे.
भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रवी खोपडे व इतर तीन साथीदार यांनी आपटी ता.भोर येथील हॉटेल एवन येथे मंगळवार दि-२२ रात्री साडे आठच्या सुमारास स्कारपीओ गाडी एमएच १२ केजे ०५६९ तुन गेले होते.तेथे हॉटेल चालक आरिफ शेख यास ५ बियर व ५ हजार रुपये भोर येथील एका पोलसाने देण्यास सांगितले आहे.ते गाडीत बसले आहेत.त्यांना फोन करून त्यांच्याशी बोला असे शेख यास सांगितले.मला वस्तूचे पैसे द्या.मी कोणाचा फोन घेत नाही असे शेख म्हनाले.मात्र राग आल्याने रवी खोपडे व साथीदारांनी खंडणी मागत शिवीगाळ करीत दमदाटी केली व मोबाईल द्वारे ५ बियरचे पैसे देत चौघेही तेथून निघून गेले.पुढील तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे व हवालदार उद्धव गायकवाड करीत आहेत.
पोलिसांनी नाहक त्रास दिल्यास तक्रार करावी,कारवाई करणार भोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वसामान्य नागरिकांना भोर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून नाहक त्रास व पिळवणूक होत असल्यास खात्रीशीर माहिती घेऊन कर्मचारी,अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल.तसेच नघाबरता नागरिकांनी आशा विषयांची तक्रार द्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी केले आहे.
COMMENTS