सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सुपे : प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि विद्या प्रतिष्ठान, सुपे येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी विकास मंडळांतर्गत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने मंगळवारी ( दि.०८ ) महाविद्यालयांमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक महिला दिनाच्यानिमित्ताने येथील महविद्यालयातील अधिकृत केंद्रामध्ये डिजिटल सहेली ऑनलाइन कार्यशाळा घेण्यात आली. येथील कार्यशाळेत महिलांना ऑनलाईन डिजिटल साक्षर करणे. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनींना वेगवेगळे कौशल्य विकास कार्यक्रमाची माहिती देण्यात आली.
या कार्यशाळेमध्ये एकविसाव्या शतकातील ऑफिस स्किल, एकविसाव्या शतकातील डेली लाईफ स्किल, स्टडी स्किल, सिटी स्किल, सायबर सिक्युरिटी याबद्दल प्रशिक्षण माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. हा अभ्यासक्रम पूर्णपणे विनामुल्य देण्यात आला.
कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयातील प्राध्यापिका लिना जराड यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राहुल पाटील होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी अनेक असामान्य अशा महिलांची उदाहरणे देऊन मानवी जीवनातील महिलांचे अनन्यसाधारण महत्त्व स्पष्ट केले. आजही भारतीय समाजात महिलांना दुय्यम स्थान कसे दिले जाते याविषयीची वास्तविकता व खंत त्यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविक प्रा. दत्तात्रय शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. सुनील भिसे यांनी केले तर आभार प्रा. रामदास गांगुर्डे यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
.......................................
COMMENTS