सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर चे सुपुत्र व मनमाड विभागाचे पोलिस उपअधीक्षक समिरसिंह साळवे यांना राष्ट्रपती शौर्य पोलिस पदकाने सन्मानित करण्यात आले.
मुंबईत राजभवन येथे झालेल्या सोहळ्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी साळवे यांचा पदक बहाल करत गौरव केला.
जिल्हा पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांना २०२० मध्ये राष्ट्रपती शौर्यपदक जाहीर झाले होते. गडचिरोली भागात तीन वर्षे कार्यरत असताना त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. ऑगस्ट २०१९ मध्ये त्यांनी नक्षलविरोधी अभियान योग्यप्रकारे राबविले होते. छत्तीसगड व महाराष्ट्राच्या सीमेवरील अबूजमाड या घनदाट जंगलात दोघा नक्षलवाद्यांचा त्यांनी खात्मा केला होता. वयाच्या २७ व्या वर्षी केलेल्या एन्काउंटरच्या धाडसी कामगिरीची दखल घेत त्यांची पदकासाठी निवड झाली होती. तीन वर्षांपासून मनमाड विभागाची यशस्वी कमान सांभाळणारे साळवे पोलिस महासंचालक पदकानेही सन्मानित झाले आहेत. साळवे यांच्या सन्मानाचे पोलिस दलातून कौतुक केले जात आहे.
COMMENTS