काय सांगता ...! अष्टविनायक दर्शन ..आणि ते ही हेलिकॉप्टरमधून : ओझर पासून आज या सेवेला सुरुवात

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
मोरगाव : प्रतिनिधी
हॅलीकॉप्टरद्वारे अष्टविनायक दर्शन सेवा आजपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरु झाली . पाच गणेश भक्तांना घेऊन ही सेवा ओझरपासून सुरु झाली. अष्टविनायक क्षेत्री देवस्थानचे विश्वस्त मंडळ  व सरपंच , पुजारी  यांनी मान्यवरांचा सन्मान केला . तर ही सेवा लवकरच कायमस्वरूपी केली जाणार असल्याची माहीती ओझरचे माजी मुख्य विश्वस्त बबन मांडे यांनी दिली .
           आज दि ३० रोजी प्रायोगिक तत्त्वावर हॅलीकॅप्टरद्वारे अष्टविनायक सेवे सुरु झाली आहे . ओझर येथे आरती करुन या सेवेस शुभारंभ झाला . आज पहील्या दिवशी  माजी अध्यक्ष बबन मांडे व इतर चार गणेश भक्त   अष्टविनायक यात्रेला आले होते . ओझर नंतर  रांजणगाव , सिध्दटेक , मोरगाव , थेऊर ,पाली , महड , लेण्याद्री असे मार्गक्रमण होणार आहे . ओझर येथील विघ्नहर देवस्थानचा हा उपक्रम आहे . यासाठी गणेश भक्त शेतकऱ्यांनी  हॅलीपॅडसाठी  विनामूल्य जमीन उपलब्ध  करून दिली आहे  . ओझर देवस्थानचे विद्यमान अध्यक्ष गणेश कवडे यांनी याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे आभार मानले 
            आज अष्टविनायक वारी करत असताना  मोरगाव येथे वरील सर्व भक्त आले असता चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विनोद पवार व  मोरगावचे विद्यमान सरपंच  निलेश केदारी यांनी मान्यवरांचा शाल फोटो देऊन यथोचित सन्मान केला .
To Top