सुपे परगणा ! ‘जुगारी’ समजून पोलिसांचा बारामती दूध संघाचे संचालकांला नाहक त्रास : धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याचा आरोप

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
मोरगाव : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील ‘मोरगाव’ येथे दि.१४ एप्रिल गुरुवार दुपारच्या सुमारास ही घटना घडलीय. वडगांव-निंबाळकर पोलीस प्रशासन यामुळे चांगलीच चर्चेत आलय. चोर सोडुन संन्याशाला फाशी देण्यासारखा हा गंभीर प्रकार घडलाय. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर ? जयंतीच्या निमित्ताने वर्गणी म्हणून गोळा केलेले ८ हजार १०० रुपये पोलिसांनी ताब्यात घेतले.
   अत्यंत प्रामाणिक आणि हुशार म्हणून गेली दहा वर्ष अरविंद गायकवाड यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संचालक पदावर अखंड संधी दिली. बारामती तालुका सहकारी दूध  संघात विद्यमान संचालक म्हणून कार्यरत आहेत. अनपेक्षित पोलिसांनी यांना धक्काबुक्की करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा त्यांचा आरोप आहे.
     नियोजित एका कार्यक्रमासाठी परगावी जाण्यास गायकवाड हे यांचे घरापासून जवळच शॉपिंग सेंटर समोर थांबले. यावेळी वडगाव- निंबाळकर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत सुपा पोलिस मदत केंद्रातील काही कर्मचारी येथे आले. अचानक मोबाईल हिसकावून घेतला. असभ्य व अर्वाच्च भाषा वापरत पोलीस मदत केंद्रात घेऊन गेले.
   दरम्यान नाहक शिवीगाळ दमदाटी केली. कुठलेही स्वरूपाचे बोलणे ऐकून घेतले नाही. जुगार , मटका व अवैध दारू विक्री साठी नेहमीच विरोध करणारा ठामपणे भूमिका घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून संचालक गायकवाड यांची ख्याती आहे. आज येथे पोलिसांनी केलेल्या गैर कृत्याबद्दल सर्व समाज स्थरातून संताप व्यक्त होत आहे.
    मोरगाव येथील या घटनेत सहभागी असलेल्या पोलीस उपनिरीक्षक व कारवाईच्या दिखाव्यासाठी आलेले चार  कर्मचारी यांच्याविरुद्ध तत्काळ कारवाई करा यासाठी ग्रामस्थ संतप्त यानंतर रात्री अतिरिक्त पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी इंगळे यांना प्रत्यक्ष भेटले. निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केले आहे.
To Top