मोरगाव दि १५
मोरगाव - सुपे रस्त्या वरून पाई चालत जात असताना मारुती ईरटिका गाडीची धडक बसून जखमी झालेल्या राहुल खैरे या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती वडगाव पोलिसांनी दिली आहे.
या बाबत सविस्तर हकीकत अशी की, 10 एप्रिल रोजी राहुल खैरे हे चुलत भाऊ गणेश खैरे यांच्यासह हॉटेल अलंकार मधून जेवण करून रोडच्या डाव्या बाजूने पायी घरी चालत जात असताना सुपा बाजूकडून मोरगाव बाजूकडे जाणारी मारुती ईरटिका नंबर एम एच: ४२ बी.बी.९५७३ या गाडीने राहुल खैरे यांना समोरुन जोरदार धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. लागलीच खैरे यांना बारामतीतील खाजगी दवाखान्यात हलवण्यात आले होते. मात्र तेथे उपचाराला साथ मिळत नसल्याने नंतर त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र तेथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चुलत भाऊ गणेश खैरे यांच्या फिर्यादीवरून मारुती ईरटिका कारच्या अज्ञात चालकाविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख हे करीत आहेत.
COMMENTS