भोर ! दक्षिण पट्ट्याला गारांसह अवकाळीने झोडपले : जनावरांच्या चाऱ्याचे नुकसान

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या दक्षिण पट्ट्यातील वीसगाव,चाळीसगाव खोऱ्याला शुक्रवार दि-२२ सायंकाळच्या वेळी गारांसह अवकाळी पावसाने झोडपले असून या अवकाळी पावसात जनावरांच्या चाऱ्याचे नुकसान झाले आहे.तर नागरिक पावसाच्या गडगडाटामुळे  भयभीत झाले आहेत.
     तालुक्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ हवामान तयार होत होते.यामुळे पाऊस पडण्याची शक्यता जास्तीत जास्त होती. शुक्रवार दि- २२ सकाळपासूनच ढगाळ वातावरण मोठ्या प्रमाणावर तयार झाल्याने सायंकाळी ५ च्या दरम्यान गारांसह अवकाळी पाऊस जोरदार बरसला.पावसात उन्हाळी पिकांचे तसेच जनावरांच्या चाऱ्याचे भिजून अतोनात नुकसान झाले.१ तास ढगांच्या गडगडासह पाऊस बरसल्याने शेतात काम करणारे नागरिक भयभीत झाले होते.


To Top