सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : प्रतिनिधी
किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत आज अर्ज माघे घेण्याच्या अंतिम दिवशी आज १९६ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ४६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ. मकरंद पाटिल व नितिन पाटिल तसेच भाजपचे विद्यमान चेअरमन मदन भोसले यांनी आज आपले अधिकृत उमेदवार यादी जाहीर केली असून याव्यतिरिक्त चार जण अपक्ष निवडणुक लढवित असल्याचे आज स्पष्ट झाले आहे.
पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या किसन वीर सहकारी साखर कारखाना भुईंज पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्यापासून सर्व शेतकरी सभासदांचे लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिलेले आहे. राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार पुढीलप्रमाणे कोठे खंडाळा ऊस उत्पादक गट - नितीन पाटील, रामदास गाढवे, किरण काळोखे, भुईंज ऊस उत्पादक गट - प्रमोद शिंदे, रामदास ईथापे, प्रकाश धुरगुडे, वाई, बावधन, जावली ऊस उत्पादक गट शशिकांत पिसाळ, दिलीप पिसाळ, हिंदूराव तरडे, सातारा ऊस उत्पादक गट - संदीप चव्हाण, बाळासाहेब कदम, सचिन जाधव, कोरेगाव ऊस उत्पादक गट - सचिन साळुंखे, ललित मुळीक, संजय फाळके, सोसायटी मतदार संघ - आ. मकरंद पाटील, सौ सुशीला जाधव, सौ सरला वीर, अनुसूचित जाती जमाती राखीव - संजय कांबळे, भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग - हणमंत चवरे, इतर मागास प्रवर्ग - शिवाजी जमदाडे.
विद्यमान चेअरमन मदनदादा भोसले प्रणित उमेदवार पुढीलप्रमाणे - कवठे खंडाळा गट - दत्तात्रय गाढवे, प्रवीण जगताप, प्रताप यादव, भुईंज गट- मदन भोसले, जयवंत पवार, दिलीप शिंदे, बावधन जावली गट - चंद्रशेखर शिंदे, सचिन भोसले, विश्वास पाडळे, सातारा गट- भुजंगराव जाधव, चंद्रकांत इंगवले, अनिल वाघमळे, कोरेगाव गट - मेघराज भोईटे, नवनाथ केंजळे, शिवाजी पवार, महिला राखीव- सौ विजया साबळे, सौ. आशा फाळके, अनुसूचित जाती जमाती - सुभाष खुडे, भटक्या विमुक्त जाती जमाती - चंद्रकांत काळे, इतर मागास प्रवर्ग - आनंदा जमदाडे, सोसायटी मतदारसंघ रतनसिंह शिंदे.
या व्यतिरिक्त भुईंज गटातून - मानसिंग नारायण शिंगटे, रा. मढे, तालुका सातारा, सातारा गटातून नवनाथ रघुनाथ साबळे, रा. वडूथ, ता. सातारा, कोरेगाव गटातून- दिलीप उध्दव जाधव, रा. जळगाव तालुका कोरेगाव, रमेश दगडू माने,
रा. भोसे ता. कोरेगाव हे अपक्ष म्हणून निवडणुक रिंगणात उतरले आहेत.
कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी या निवडणुकीमध्ये स्वारस्य दाखवले होते. यामुळे ही निवडणूक तिरंगी होते की काय अशी दाट शक्यता होती. मात्र आज अर्ज माघार घेण्याच्या अंतिम दिवशी ही निवडणूक आमदार मकरंद पाटील व विद्यमान चेअरमन मदन भोसले यांच्यात सरळसरळ दुरंगी होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
COMMENTS