सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील रामराजे सह. सोसायटी अध्यक्षपदी चंद्रशेखर जगताप तर उपाध्यक्षपदी अशोकराव जाधव यांची बिनविरोध निवड पार पडली.
आज पार रामराजे सोसायटीत ही निवड सोसायटीचे मार्गदर्शक व सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष
पुरुषोत्तम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड पार पडली. यावेळी मावळते अध्यक्ष बाळासाहेब जगताप, दिग्विजय जगताप, राजेंद्र जगताप, संतोष जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमर गायकवाड यांनी काम पाहिले. त्यांना सचिव किरण जगताप व सह सचिव प्रदीप जगताप यांनी सहकार्य केले.
COMMENTS