सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था ही सामाजिक बांधिलकी जपत उल्लेखनीय कामकाज करीत यशस्वी झाली आहे.तसेच पतसंस्था नवनवीन उपक्रम राबवून इतरांचे प्रेरणास्थान ठरत असून शिक्षक सभासदांचे हीच जोपासणारी असल्याचे प्रतिपादन संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे यांनी केले.
कार्यक्रम प्रसंगी सेवानिवृत्त सभासद,पदाधिकारी, जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक पंचायत समिती गुणवंत शिक्षक तसेच ईयत्ता दहावीत प्रथम क्रमाकाने उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांच्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देवून सन्मान करण्यात आला.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, संस्थेचे सभापती राजेंद्र बोडके, माजी सभापती विकास खुटवड, कार्यलक्ष्मी संचालक जयवंत जाधव, तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष सुदाम ओंबळे, जिल्हा संघ कार्याध्यक्ष पोपट निगडे,शिक्षक नेते पंडित गोळे,बापू जेधे,आनंद गोसावी,भीमराव शिंदे,सेवानिवृत्त शिक्षक गुलाब थोपटे, हरीचंद्र थोपटे,मोरे,कुंभार तसेच सर्व संचालक व शेकडो सभासद उपस्थित होते.
माजी जिल्हा परिषद विठ्ठल आवाळे पुढे म्हणाले आर्थिक व सामाजिक जीवनात क्रांतिकारक बदल घडवून आणणारी सामाजिक संस्था म्हणजे सहकार होय आणि या सहकारातील जिल्ह्यात भोर तालुक्यातील प्राथमिक शिक्षक पतसंस्था ही नंबर एकची ठरत आहे.
COMMENTS