सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाकी ता बारामती येथील गणेश किसन जगताप या शेतकऱ्याने तब्बल साडेआठ किलो वजनाच्या रताळ्याचे उत्पादन घेतले आहे.
जगताप यांनी पाच महिन्यांपूर्वी वाकी ता बारामती येथे स्वतःच्या शेतात ८ पांडात रताळ्याचे पीक केले होते. त्यातील काही रताळ्याचे पीक दोन महिन्यापूर्वी काढले.
ऊस पीक करण्यासाठी शेतीची मशागत करताना राहिलेले रताळ्याचे वर आले. यातील एका रताळ्याचे वजन केले असता ते साडेआठ किलो भरले.
COMMENTS