सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतराव पिसाळ
आज पहाटे ०३.०० वा.चे सुमारास शिरवळ पोलीस ठाणे हद्दीत सातारा ते पुणे जाणारे हायवे रोडवर पुणे बसथांब्यावर कोल्हापूर ते आळंदी जाणारे वारकऱ्यांच्या दिंडीच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला क्रमांक एम.एच.१०.वाय. ५७०५ ला पाठीमागुन भरधाव वेगात येणाऱ्या भाजीचा आयशर टेम्पो क्र.एम.एच.४५. ए.एफ.२२७७ ने पाठीमागून धडक दिल्यामुळे अपघात झालेला आहे.
सदर अपघातात एकूण २८ वारकरी जखमी झाले असून त्यापैकी एक वारकरी मायाप्पा कोंडीबा माने रा.भादोले, ता. हातकणंगले, जि.कोल्हापूर हे मयत झाले असून १ वारकरी नामे मारुती भैरुनाथ कोळी हे गंभीर जखमी असून त्यांचेवर जोगळेकर हाॅस्पीटल शिरवळ येथे उपचार चालू आहेत. अपघातात जखमी व मयत झालेले सर्व वारकरी हे भादुले, ता.हातकणंगले, जि. कोल्हापूर येथील राहणारे आहेत.
COMMENTS