सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
मोरवाडी ता.भोर येथे दुचाकी चोरणाऱ्या तीन अल्पवयीन चोरट्यांना राजगड पोलिसांनी दोन चोरी केलेल्या दुचाकीसहित पकडले. पोलिसांनी या तिघांच्या कागदपत्रांची पडताळणी केली असता हे तीनही जण अल्पवयीन असल्याचे आढळून आले. यामुळे या तिघांनाही पोलिस ठाण्यातुन सोडून देऊन बाल न्याय मंडळ पुणे येथे अंतिम अहवालासहित हजर राहण्याचे आदेश पोलिसांनी दिले.
काळदरी ते किकवी या रस्त्यावरून दोन चोरी गेलेल्या मोटर सायकलवरून तिघेजण येत असत असल्याची खबर राजगड पोलिसांना मिळाली. यानुसार पोलिसांनी या रस्त्यावर मोरवाडी येथे सापळा रचला. यादरम्यान यमाहा कंपनीची चॉकलेटी रंगाची व काळया रंगाची स्प्लेंडरवर तिघेजण आले असल्याचे आढळून आले. यावेळी पोलिसांनी त्यांना शिताफीने पकडले. या दोन्ही दुचाकी सारोळा पुलाच्या खालून व किकवी येथील बैल बाजारातून चोरी केल्याचे या अल्पवयीन चोरट्यांनी सांगितले.
राजगड पोलिसांनी सदरचे तिन्ही चोरटे अल्पवयीन असल्याने या तिघांना बाल न्यायमंडळ पुणे येथे अंतिम अहवालासहित हजर राहण्याचे आदेश देऊन सोडुन दिले. सदरची कारवाई राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ, सहाय्यक फौजदार अंकुश खोमणे, पोलीस हवालदार महेश खरात, जगदीश शिरसाठ, राजेंद्र चव्हाण, पोलीस नाईक नाना मदने, गणेश लडकत, मयुर निंबाळकर, पोलीस कॉन्स्टेबल योगेश राजिवडे यांनी केली.
COMMENTS