सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
कोऱ्हाळे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील कोर्हाळे बुद्रुक येथील नामदेव चंद्रकांत अडागळे हा जन्मा पासून अंध. त्यात आई विना पोरका. इयत्ता तिसरी पर्यंत शिक्षण जिल्हा परिषद शाळा मतकरवस्ती येथे झाले .शाळेतील शिक्षकांच्या मदतीला पुणे येथील दि पुणे स्कूल आणि होम फॉर ब्लाइंड या अंधशाळेत पुढील शिक्षणासाठी दाखल केले. त्याला इयत्ता दहावी ला ७१.२० टक्के मार्क मिळाले. बारामती तालुक्यातील त्याचे कौतुक होत आहे.
घ। रातील मंडळी ला आनंद झाला.. गावातील मंडळींनीही त्याचा सत्कार करून गौरव केला .. बापु धापटे मित्र मंडळ व प्रमोद पानसरे निवासी नायब तहसीलदार काळे यांनी आज त्याच्या घरी जाऊन सत्कार करून आर्थिक स्वरूपात मदतही केली. यावेळी समीर मतकर, संपत शिरतोडे, दत्ता नलावडे, सचिन घाडगे हे उपस्थित होते.
याची काळजी घेणारे वृद्ध जयसिंगराव अडागळे हे आजोबा सांगत होते पोरगा शिकून मोठा झाला माझे माझं पांग फिटलं . बिना आईचं पोरं ते .. पुढं त्याच काय होईल याचीमला चिंता मला आहे.