सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वडगाव निंबाळकर : सुनील जाधव
वडगाव निंबाळकर येथील स्वातंत्र्य विद्या मंदिर शाळेतील इयत्ता दहावीच्या शालेय परीक्षेमध्ये प्रथमेश सतीश सुतार यांने प्रथम क्रमांक पटकावला आहे,89.80% गुण मिळवत कौतुकाची थाप आपल्या पाठीवर घेतली आहे.घरची परिस्थिती अत्यंत साधारण वडील सुतारकाम करतात व आई घरकाम करून कापड दुकानात काम करत घर चालवत आहेत. परिस्थितीची जाणीव असल्यामुळे प्रथमेश ने जिद्द व चिकाटी मेहनतीच्या जोरावर हे यश प्राप्त केले आहे. दहावीत प्रथम क्रमांक मिळाल्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक अनिल गवळी व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल जाधव यांनी शुभेच्छा व त्यांचा सत्कार केला. पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रथमेशने सांगितले की इच्छा शक्ती आणि मेहनत करण्याची ताकत असेल तर अशक्य गोष्टी शक्य होतात. प्रथमेश चे हे यश म्हणजे सर्वांना प्रेरणादायी घेण्यासारखे आहे.
COMMENTS