सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : दीपक जाधव
बारामती तालुक्यातील वढाणे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या तज्ञ ( स्विकृती ) संचालकपदी ॲड. ज्ञानदेव तुळशीराम चौधरी आणि अर्जुन मारुती चौधरी यांची निवड करण्यात आली.
या संस्थेची मासिक सभा नुकतीच संस्थेच्या कार्यालयात पार पडली. या संचालक मंडळाच्या सभेमध्ये ॲड. ज्ञानदेव तुळशीराम चौधरी व अर्जुन मारुती चौधरी यांची तज्ज्ञ संचालक म्हणून बहुमताने निवड करण्यात आली आहे.
या सभेस संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ लकडे, उपाध्यक्ष रुख्मिणी चौधरी व सर्व संचालक, सचिव राजाराम भोंडवे तसेच सहसचिव विठ्ठल गोसावी, कालिदास भोंडवे, सचिन चौधरी, बाळासाहेब भोंडवे, भानुदास चौधरी, बाळासाहेब लकडे, बबन चौधरी, संदीप चौधरी, चंदन चौधरी आदी उपस्थित होते.
..............................
COMMENTS