पावसाची ओढ ! 'सोमेश्वर'च्या कार्यक्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल २ हजार एकर ने आडसाली ऊस लागवड घटली : ८६०३२ ला पसंती

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकरी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात पावसाने ओढ दिल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी आडसाली ऊसाची लागवड २ हजार एकराने घटल्याची माहिती अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. 
              सोमेश्वर कारखान्यावर आज आडसाली ऊस लागवडीचे लकी ड्रॉ नंबर काढताना अध्यक्ष जगताप बोलत होते. यावेळी माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, मा. संचालक किशोर भोसले, शेतकी अधिकारी बापूराव गायकवाड, केनयार्ड सुपरवायझर योगेश पाटील, सभासद बाळासाहेब जगताप, महेश शिंदे, धनंजय भोसले, नितीन जगताप, सुनील चव्हाण, नारायण जगताप, सचिन चव्हाण माऊली कदम यांच्यासह शेतकी विभाग कर्मचारी अशोक जगताप, रमेश जगताप, महेश जगताप कल्याण जगताप, नितीन जगताप, गोपाळ भोसले, उमेश ढवळे, निलेश शिंदे, रणजित भोसले, उमेश रणवरे आदी मान्यवर उपस्थित होते. 
           यावर्षी सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात एकही अवकाळी पाऊस पडला नाही. तसेच मान्सुन देखील ओढ दिल्याने जिरायती भागातील सभासदांनी आडसाली ऊस लागवड करायला आखडता हात घेतला आहे. नीरा खोऱ्यात अजूनही पाण्याची उपलब्धता असल्याने ८ हजार ९०० एकरांवर आडसाली ऊसाची लागवड झाली आहे. यामध्ये सभासदांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत ८६०३२ या उसाच्या जातीला जास्त पसंती दिल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षी ८६०३२ या ऊसाची लागवड ५ हजार१४८ एकरांवर झाली होती ती यावर्षी ४०० एकराने वाढली तर ०२६५ या ऊसाची लागवड ५ हजार ९०० एकरांवरून ३ हजार ३५३ एकरांवर आली आहे.
To Top