सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर शहरातील मंगळवार पेठ येथील शुभांगी सुनिल काळे यांना महाराष्ट्र शासन उद्योग संचनालय जिल्हा उद्योग केंद्र मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम यांचेकडून कर्ज प्रकरणे करून देतो असे म्हणून फिर्यादी तसेच फिर्यादीची मुलगी संजना व पुतण्या आशिष यांची वेळोवेळी फोन पे , गुगल पे तसेच कॅनरा बँक भोर या बँकेत जाऊन पैसे डिपॉझिट करून एकूण रक्कम २६ हजार ५७० रुपयाची फसवणूक केली आहे.
भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोर शहरातील मंगळवार पेठेतील शुभांगी सुनिल काळे वय - ४२ यांना तसेच त्यांची मुलगी संजना व पुतण्या आशिष यांना महाराष्ट्र शासन उद्योग संचनालय जिल्हा उद्योग केंद्र मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम यांचेकडून कर्ज प्रकरणे करून देतो असे म्हणून आरोपी राज पाटील व श्याम गवळी (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांनी दि.६/२/२०२१ रोजी ते दि.२७/१०/२०२१ रोजी पर्यंत वेळोवेळी मंगळवार पेठ भोर जिल्हा पुणे येथे वेळोवेळी फोन पे , गुगल पे तसेच कॅनरा बँक भोर या बँकेत जाऊन पैसे डिपॉझिट करून एकूण रक्कम २६५७० रुपयाची फसवणूक केली.यांचे भोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पुढिल तपास भोर पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे, पोलिस हवालदार उद्धव गायकवाड, पोलिस नाईक वर्षा भोसले पुढील तपास करीत आहेत.
COMMENTS