सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
वाई : प्रतिनिधी
वाईतील माजी पोलिस उपअधीक्षक कै.ज्योतिराम सावंत यांच्या सुविध्द पत्नी श्रीमती छबुताई ज्योतोराम सावंत यांचे वयाच्या ९० व्या वर्षी दि.२९ रोजी दुःखद निधन झाले होते.
सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष असलेल्या .अल्पना प्रताप यादव यांच्या त्या मातोश्री होत तसेच यशवंत शिक्षण संस्था सुरूरचे अध्यक्ष आणी रविऊदय पतसंस्थेचे संस्थापक व किसनवीर कारखान्याचे माजी संचालक ऊद्योजक प्रताप यादव यांच्या त्या सासु होत. यांचे निधन झाल्याची माहिती आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना समजल्यावर आपल्या पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष असलेल्या कार्यकर्त्याच्या मातोश्रीचे निधन झाल्याने त्यांनी वाई येथे येऊन जिल्हाध्यक्ष.अल्पना यादव यांच्या सह सावंत कुटुंबीयांचे निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या वेळी अल्पना यादव प्रताप यादव आणी सावंत कुटुंबीयांच्या वतीने आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना तुळशीच्या झाडाची कुंडी भेट देण्यात आली .
या वेळी प्रताप यादव कॉंग्रेसचे जिल्हा पदाधिकारी असलेले प्रताप देशमुख विराज शिंदे वाई तालुका अध्यक्ष रवींद्र भिलारे विशाल डेरे गणेश सावंत शहाजी पिसाळ कल्याण पिसाळ राजेंद्र पाडळे व इतर कॉग्रसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते . या वेळी पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी ऊपस्थित कार्यकर्त्यांन बरोबर कॉंग्रेस पक्षाच्या विविध विषयांवर संवाद साधला .त्या मुळे या तरुण कार्यकर्त्यांन मध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे .
COMMENTS