रुपाली चाकणकर यांच्यावरील आक्षेपार्ह कमेंट भोवली : २८ जणांवर गुन्हा दाखल

Admin
2 minute read
सोलापूर : 
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या २८ जणांविरोधात बार्शी  शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बार्शीच्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. या बाबतची तक्रार राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून करण्यात आली होती.
        वटपौर्णिमाबाबत रूपाली चाकणकर यांनी एक भूमिका मांडली होती. या भूमिकेबाबत एका फेसबुक पेजवरील पोस्टवर युवराज ढगे याने आक्षेपार्ह कमेंट केली होती. त्यानंतर पोलिसांनी चार दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्राच्या विविध भागातील २८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
To Top