सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

वाई ! प्रतिनिधी : दौलतराव पिसाळ ! स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वाई शहरात ९ ते १८ ऑगस्टपर्यंत कार्यक्रमांची रेलचेल


सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई,: प्रतिनिधी
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत वाई तालुक्यात ९ ते१८ ऑगस्टपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव,तहसीलदार रणजीत भोसले,गटविकास अधिकारी नारायण घोलप,वाई पालिकेचे मुख्याधिकारी किरणकुमार मोरे, तालुका कृषी अधिकारी मनोज शेंडे,भूमी अभिलेख उपाधीक्षक आशा जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
घरोघरी तिरंगा या मोहिमेअंतर्गत ग्रामपंचायत,पंचायत समिती, नगरपालिका कार्यालयात ध्वज विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आचारसंहितेचे पालन करून  नागरिकांनी आपल्या घरावर ध्वज फडकवावा,असे आवाहन प्रांताधिकाऱ्यांनी केले आहे.
तालुक्याच्या विविध विभागांनी परस्पर समन्वयाने विविध कार्यक्रमांचे नियोजन केले आहे.  दि. ९ जांब येथे स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार,किसन वीर स्मारक कवठे येथून प्रभात फेरीने वीर कुटुंबीयांच्या घरी भेट व कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे.
१० ऑगस्ट रोजी तालुकास्तरावर महिला बचत गटांच्या मेळाव्याद्वारे महिलांची आर्थिक साक्षरता व ७५ बचत गटांना कर्ज वितरण व उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.याच दिवशी किकली येथे महिला व किशोरींसाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
पाचवड ग्रामपंचायतीच्या वतीने महिला मेळावा निबंध,पाककला स्पर्धा  व व्याख्यान होणार आहे.
११ ऑगस्ट रोजी परखंदी येथे सैनिक माजी सैनिकांचा सत्कार व प्रभात फेरी कार्यक्रम होईल.बोपेगाव येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
दि.१२ रोजी तालुकास्तरावर पंचायत समिती किसन वीर सभागृहात विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.याच दिवशी कणूर येथील महिला ग्रामसभेत ९६ महिला विधवा प्रथेतून मुक्त होणार आहेत.
केंजळ येथे स्तनपान सप्ताह, पूरक पोषक आहार प्रदर्शन व स्तनदा मातांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
दि.१३ रोजी वेळे ग्रामपंचायत व दानशूरांच्या सहकार्याने २०० मुलांची 'गोपाळांची पंगत' आयोजित करण्यात आली आहे.पंगतीत विद्यार्थ्यांना केळी, खजूर आदी पौष्टिक फळांचे वाटप करण्यात येणार आहे.
खानापूर येथे वृक्षारोपण व पर्यावरण जागृती,भुईंज येथे किशोरी मेळाव्यात आहार आरोग्य व शारीरिक बदलांविषयी मार्गदर्शन आणि हिमोग्लोबिन तपासणी करण्यात येणार आहे.
सकाळी ७५ शिक्षक सायकल रॅलीने खानापूर येथे जाऊन वृक्षारोपण करणार आहे.
दि.१४ रोजी पसरणी येथून पर्यावरण जागृती सायकल रॅली वाई व पुन्हा पसरणी येथे जाईल.  
दि.१५ रोजी तालुकास्तर रांगोळी व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. उडतरे येथे ७५ ज्येष्ठ नागरिकांचा कृतज्ञता सन्मान करण्यात येणार आहे. याच दिवशी दरेवाडी गावातील महिला १०० टक्के कचरामुक्त गाव व घनकचरा,सांडपाणी व्यवस्थापन कार्यक्रम स्वयंप्रेरणेने राबविणार आहेत. 
आजादी का अमृत महोत्सवांतर्गत विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण १७ रोजी पंचायत समिती,वाई येथे करण्यात येणार आहे.देशभक्त किसन वीर यांच्या जयंतीदिनी अमृत महोत्सव कार्यक्रमांची सांगता किसन वीर यांच्या जीवनकार्यावर आधारित नाट्यप्रवेशांचे सादरीकरणाने व बक्षीस वितरण समारंभाने होईल, या कार्यक्रमास आमदार मकरंद पाटील व लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील.अशी माहिती यावेळी देण्यात आली.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7054,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : वाई ! प्रतिनिधी : दौलतराव पिसाळ ! स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वाई शहरात ९ ते १८ ऑगस्टपर्यंत कार्यक्रमांची रेलचेल
वाई ! प्रतिनिधी : दौलतराव पिसाळ ! स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वाई शहरात ९ ते १८ ऑगस्टपर्यंत कार्यक्रमांची रेलचेल
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjmlaRZk18lA_cr4tJANvj_PG5h1XeK204YJsm9PF0OiaV8JXhIOgylB8cs5F15ZsVnC9de7wAPuD7R4woJpgVSVIyAlGyZ5wbZMqQM7GTHVk7eX_h34FXbgC2Qr8Y9VFLQTnDLyasyqxhR/s1600/1660008554348154-0.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjmlaRZk18lA_cr4tJANvj_PG5h1XeK204YJsm9PF0OiaV8JXhIOgylB8cs5F15ZsVnC9de7wAPuD7R4woJpgVSVIyAlGyZ5wbZMqQM7GTHVk7eX_h34FXbgC2Qr8Y9VFLQTnDLyasyqxhR/s72-c/1660008554348154-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2022/08/blog-post_63.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2022/08/blog-post_63.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy