पुरंदर ! तुम्ही कधी आपल्या दातांची तपासणी करून घेतली आहे का? ....तर या आज नीरा येथे आपल्या दातांची मोफत तपासणी करायला....!

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : प्रतिनिधी 
पुरंदर तालुक्यातील नीरा शहरातील अमृतमहोत्सव आयोजन कमिटी यांनी  देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य चा अमृतमहोत्सवा निमित्त दंत तपासणीचे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. 
        आज ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते १ यावेळेत या दंत तपासणी शिबिराचे आयोजन नीरा येथे राधाकृष्ण मंगल कार्यालयात करण्यात आले आहे. यासाठी डॉ कुलदीप काकडे, डॉ श्रेणिक शहा, डॉ सचिन निगडे व डॉ सूरज जमदाडे हे दंतवैद्य आपल्या दातांची तपासणी करणार आहेत. 
 तनुजा शहा व मंगेश ढमाळ यांच्या संकल्पनेतून तसेच नीरा शहर अमृतमहोत्सव कमिटी यांनी या शिबिराचे आयोजन केले आहे.
To Top