शिरोळ ! शिरोळ ते अक्कलकोट पायी दिंडीचे प्रस्थान : १३ वर्षांपासून श्री स्वामी समर्थ ग्रुपचा उपक्रम

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
शिरोळ : प्रतिनिधी  
महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थच्या जयघोषात शिरोळ होऊन अक्कलकोटला पायी दिंडीचे प्रस्थान झाले. 
गेल्या 13 वर्षापासून शिरोळ येथील श्री स्वामी समर्थ ग्रुपच्या वतीने गुरुपौर्णिमेच्यानिमित्ताने शिरोळ ते अक्कलकोट पायी दिंडी सोहळा आयोजित केला जातो गुरु पौर्णिमेला अक्कलकोट येथे अन्नछत्र मंडळात महाप्रसादासाठी हे सर्व स्वामीभक्त सेवा करीत असतात सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे आज सोमवारी सकाळी येथील स्वामीभक्त बाळासाहेब चव्हाण यांच्या निवासस्थानातून या पायी दिंडीचे प्रस्थान झाले शिरोळ तालुका भाजप नेते अनिलराव यादव यांच्या हस्ते दिंडीतील वाहनांचे पूजन करण्यात आले यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव उपाध्यक्ष व नगरसेवक डॉ अरविंद माने जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी चव्हाण यादव विकास सोसायटीचे संचालक आयजाक भोरे यासीन शेख दीपक मोहिते अमर जाधव चंद्रकांत भाट गजानन सावंत अभिजीत काशीद गजानन भाट यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या दिंडीचे प्रस्थान झाले
स्वामी समर्थ ग्रुपचे प्रमुख संजय उर्फ संभाजी चव्हाण कृष्णराव मोरे उमेश कोळी अक्षय काशीद देवेंद्र काशीद शुभम कोळी प्रकाश कोळी अवधूत माने अवधूत नाईक नितीन मिणचे  आदित्य जाधव पारस भाट गुरुप्रसाद भाट सत्यजित काशीद( बबलू )नाना जगदाळे  शंतनू चव्हाण निरंजन सूर्यवंशी वैभव कदम यश काशीद राजू कोळी तुकाराम मोरे दिलीप माने  अमोल माने तुकाराम पाटील भीमराव जाधव प्रकाश कुरडेकर आदींनी दिंडीत सहभाग घेतला आहे
To Top