भोर ! हिंदू-खाटीक समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
यंदाच्या शैक्षणिक वर्षात १० वी,१२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक अरुण गालिंदे,सरकारी वकीलपदी निवड झालेल्या प्रणिता घोलप, कॅनरा बँक अधिकारीपदी निवड झालेले स्वराज निकुडे तर पोलीस खात्यात निवड झालेले आदित्य घोणे यांचा सामाजिक बांधिलकी जपत हिंदू-खाटीक समाज भोर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. 
     यावेळी  हिंदू-खाटीक समाजाचे  तालुकाध्यक्ष विनय पलंगे, उपाध्यक्ष दुर्गेश घोणे, सचिव धिरज पलंगे तसेच पदाधिकारी स्वप्नील घोणे, निखिल घोणे, सिद्धार्थ थोरात, शुभम घोणे, योगीराज कांबळे कार्यकर्ते सौरभ गायकवाड, प्रतीक गायकवाड, योगेश घोलप, शिवम पलंगे तसेच भोर तालुका हिंदू खाटीक समाजातील अनेक बांधव भगिनी उपस्थित होते.
To Top