Breaking news ! आज दोन तासासाठी 'या' वेळेत पुणे-बेंगलोर महामार्गावरील खंबाटकी बोगदा राहणार बंद

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी 
उपविभागीय पोलीस अधिकारी,  वाई तसेच भुईंज पोलीस ठाणे यांचे मार्फत नागरिकांना आवाहन करण्यात येते की, वेळे येथील खंबाटकी बोगदयाचे दुरुस्तीचे कामकाज आज दिनांक १८/०८/२०२३ रोजी दुपारी ०२.३० ते ०४.३० वा चे दरम्यान करण्यात येणार आहे. तरी सातारा बाजुकडून पुणे बाजुकडे खंबाटकी बोगदा मार्गे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. हलक्या वाहनांकरिता पर्यायी मार्ग खंबाटकी घाट मार्गे आहे. जड वाहनांकरिता पुणे बाजूकडे जाणारी सर्व वाहतूक नमूद वेळेत पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी सदर वेळेत पुणे बाजूकडे प्रवास टाळावा.
To Top