सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर-मांढरदेवी मार्गावरील आंबाडखिंड ता.भोर घाटात वन विभागाच्या हद्दीच्या पुढील वळ-णावर बुधवार दि. २८ दरड कोसळली.ही घटना पहाटेचे वेळी घडल्याने घाटात वाहतूक तुरळक होती.यामुळे जीवितहानी टळली असून ठेकेदाराने तात्काळ राडारोडा बाजूला करून वाहतूक सुरुळीत केली.
आंबाडखिंड घाटात दरड कोसळली असून घाटात वाहनांच्या रागा लागल्या आहेत अशी माहिती आंबाडे येथील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खोपडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली.यावेळी घाटात सुरु असलेल्या कामाच्या ठेकेदाराने सुपरवायझर राजू मल्लिकवडे यांना याबाबतची कल्पना दिली.त्यानुसार, मल्लिकवडे यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत जेसीबीच्या साह्याने रस्त्यावर पडलेला राडारोडा तात्काळ बाजूला केला.काही वेळातच वाहतूक सुरळीत करण्यात आली.घाटात दरड पडल्यामुळे दोन्ही बाजूने थोड्या प्रमाणात काहीवेळ वाहतूक ठप्प झाली होती.सुदैवाने जीवित हानी टळली.सद्या तालुक्यात पावसाने थैमान घातले असल्यामुळे डोंगरदऱ्यातून पाण्याचे झरे फुटले आहे. घाट रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून रस्त्याच्या कामात अडचनी येत आहेत.रस्त्याच्या दोन्ही कडून डोंगर पाडून रस्ता रुंदीकरण करण्यात आलेला आहे.वाहनचालकांनी या मार्गावरून आपली वाहने सावकाश चालवावीत तसेच घाट माथ्यावर प्रवाशांनी थांबू नये.दरडी कोसळण्याचा धोका आहे असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता योगेश मेटेकर यांनी सांगितले.