सुपे परगणा l अवकाळी पावसाने सुपे परिसराला झोडपले : परिसरातील ओढे नाले भरुन वाहु लागले

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
सुपे (ता. बारामती) परिसरात मागिल पाच दुवसापासुन होत असलेल्या अवकाळी पावसाने अक्षरश: झोडपुन काढले. या परिसरातील तलाव तसेच ओढे - नाले भरुन वाहु लागले. यामुळे काही घरांचे तसेच भाजीपाला, भुईमुग, टोमॅटो, कोथंबिर आणि चारा पिकांना फटका बसला आहे. त्यामुळे या पिकांची नुकसान भरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
      मे महिण्याच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मागिल पाच दिवसापासुन होत असलेल्या अवकाळी पावसाने सुपे परिसरात दमदार हजेरी लावली. त्यामुळे या परिसरातील ओढे - नाले तसेच परिसरातील तलाव भरुन वाहु लागले. वढाणे परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे दोन घरांचे तसेच भईमुग, टोमॅटो आणि चारा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासंदर्भात येथील गाव कामगार तलाठी यांच्याकडे नुकसान भरपाई मिळण्याची मागणी येथील शेतकऱ्यांकडुन करण्यात आली आहे.
        तर सुपे येथे रविवारी ६८ तर सोमवारी ६५ मिलीलीटर पावसाची नोंद झाली. तर आज ( मंगळवारी) सकाळपासुन अधुन मधुन जिराच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे येथील बाजारतळावर पावसाचे पाणी साठुन तळ्याचे स्वरुप आले होते. तर सुपे येथे या महिण्यात आत्तापर्यंत सुमारे ३११ मिलीलीटर पावसाची नोंद झाली आहे. या परिसरातील वढाणे, बोरकरवाडी, कुतवळवाडी, भोंडवेवाडी, चांदगुडेवाडी, काळखैरेवाडी, बाबुर्डी, पानसरेवाडी, दंडवाडी, नारोळी, कोळोली आदी भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतालाही तळ्याचे स्वरुप आले आहे. या परिसरातील तलाव भरुन वाहु लागले आहेत. त्यामुळे कऱ्हा नदी वाहु लागल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. 
          ------------------------------
    
To Top