सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पुणे : प्रतिनिधी
सद्या सोशल मीडियावर चंगळ्या बोले कुहू करत सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या वीर ता. पुरंदर येथील चंगळ्या उर्फ शुभम माळवे याला त्याचाच वडिलांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे.
शुभम आणि त्याच्या आई यांनी शिंदे महिला आणि त्यांच्या पतीच्या विरोधात अपमानजनक आणि खोटा व्हिडिओ बनवला. त्यानंतर तो सोशल मीडियावर पोस्ट करून प्रसिद्धी मिळवल्याचा आरोप वकील वाजीद खान बिडकर यांनी केला आहे.
'चंगळ्या'ने जाणूनबुजून शिंदे आणि त्यांचे पती यांच्याबद्दल अपमानजनक व्हिडिओ बनवून त्यांना मानसिक त्रास होईल, असा मजकूर तयार करून सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी अपलोड केला असा आरोप शिंदेंच्या वतीने करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणी आता 'चंगळ्या' आणि त्याची आई निर्मला माळवे यांनी ७ दिवसात उत्तर द्यावं, असं या नोटीस मध्ये म्हणलं गेलं आहे