Purandar News l जेष्ठ साहित्यिक प्रा. व. बा. बोधे यांचा 'विशेष ग्रंथकार पुरस्कार' देऊन गौरव

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निरा : प्रतिनिधी
कादंबरीतून शेतकरि, दलित, उपेक्षित आणि वंचित घटकांच्या वेदना मांडणारे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. व. बा. बोधे यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने 'विशेष ग्रंथकार पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.
          कादंबरी साहित्य प्रकारात विशेष योगदान दिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयाचे निवृत्त मराठी विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम केले आहे. पुणे येथे 'मसाप'च्या वर्धापनदिना निमित्त विशेष ग्रंथकार व वार्षिक ग्रंथ पुरस्कार वितरण समारंभ नुकताच पार पडला. याप्रसंगी ज्येष्ठ हिंदी लेखिका डॉ. सविता सिंह यांच्या हस्ते प्रा. बोधे यांना विशेष ग्रंथकार पुरस्काराने गौरविण्यात आले. याप्रसंगी 
'मसाप'चे अध्यक्ष रावसाहेब कसबे डॉ. शिवाजीराव कदम, प्रा. मिलिंद जोशी, राजीव बर्वे, सुनीतराजे पवार, विनोद कुलकर्णी आदी उपस्थित होते. नीरा येथील  प्रा. बोधे यांनी गेली पन्नास वर्षे मराठी साहित्याचे नाटक, आत्मचरित्र, चरित्र, बालसाहित्य, कथा, कादंबरी, ललित असे अनेक हाताळत शंभर पेक्षा अधिक लेखन केले आहे. विशेष म्हणजे सत्तर पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिणारे ते दुर्मिळ लेखक आहेत. कादंबरीतून मांडण्याचे मोठे कार्य त्यांनी केले आहे. त्यामुळे त्यांना थोर कादंबरीकार ह. ना.आपटे यांच्या नावाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
To Top