सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बिड : प्रतिनिधी
बीडमध्ये थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. माजलगाव तालुक्यातील निन्नूडजवळ तेलगाव-माजलगाव रस्त्यावर भरधाव ट्रकने रिक्षाला धडक दिली. यानंतर साठ फुटापर्यंत रिक्षाला फरफटत नेले. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी आहेत.