सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामती आगाराच्या एस.टी. कामगार संघटनेच्या सन २०२६ साठीच्या वार्षिक निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर विविध पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अध्यक्ष पदासाठी सहा उमेदवार तर सचिव पदासाठी दोन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. मात्र संघटनेत एकोपा राहावा व निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी सामान्य कर्मचाऱ्यांची भावना होती.
कर्मचाऱ्यांच्या या भावनांचा सन्मान राखत संघटनेचे ज्येष्ठ नेते घनश्याम शिंदे, रविंद्र कांबळे, सोसायटीचे उपाध्यक्ष राजेंद्र हाके, संचालक दादासाहेब साळवे, माजी संचालक शाहिद सय्यद, प्रकाश काळभोर, सोनबा वाडकर, राजेंद्र गवंडी, बाळासाहेब देवकाते व संग्राम कोंढाळकर यांनी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. अध्यक्ष पदाच्या शर्यतीतून विकास भोसले, विकास काळे, श्रीनाथ शेलार, पांडुरंग ताठे व धनंजय पवार यांनी माघार घेतली. तसेच सचिव पदाच्या शर्यतीतून सनी मोरे यांनी माघार घेतल्याने अध्यक्षपदी श्री लतीब आतार आणि सचिवपदी श्री विकास सावंत यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी श्री सोमनाथ लोखंडे यांनी केली. या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त करत फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. उपस्थित सर्वांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. निवडणूक प्रक्रियेत निवडणूक अधिकारी सोमनाथ लोखंडे व बाळासाहेब काशीद यांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली.
येत्या काळात संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे, सरचिटणीस हनुमंत ताटे, विभागीय अध्यक्ष मोहन जेधे व विभागीय सचिव दिलीप परब यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांच्या प्रलंबित समस्या लवकरात लवकर सोडवून कामगारांना न्याय व दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे नवनिर्वाचित सचिव विकास सावंत यांनी सांगितले
