सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजेपुल बस स्टॅन्ड परिसरात कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेतलेल्या व्यक्तींवरच हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली.
या प्रकरणात परस्परविरोधी दोन गुन्हे दाखल करत एकूण १३ जणांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले असून, त्यापैकी ८ आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व त्यांच्या मित्रांनी बेकायदेशीर जमाव जमवून काचेच्या बॉटल, लाकडी दांडके तसेच लाथा-बुक्क्यांनी फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांवर हल्ला केला. या हाणामारीत ऋषिकेश सुरेश शिंदे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सान्वी हॉस्पिटल, करंजेपुल येथे उपचार सुरू आहेत. यातील फिर्यादी ऋषिकेश सुरेश शिंदे याने दिलेल्या फिर्यादीवरून सखाराम अहिरे
गणेश अहिरे महेश अहिरे (नसरापूर, ता. वेल्हा, जि. पुणे)
स्नेहल सुरेश जगताप (निंबुत, ता. बारामती) सागर बाळू साळुंखे, संकेत सतीश सोनटक्के (मानाजी नगर, साक्षी संकुल फेज, पुणे) साहिल भरत सावंत, संदीप लक्ष्मण लगस (सिंहगड रोड, विठ्ठलवाडी हिंगणे, पुणे) तसेच स्नेहल सुरेश जगताप (निंबुत, ता. बारामती) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संकेत सुरेश शिंदे, ऋषिकेश सुरेश शिंदे, निकिता गणेश अहिरे, रत्ना सुरेश शिंदे, अश्विनी संकेत शिंदे (सर्व राहणार करंजेपुल, ता. बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सपोनि नागनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे तपास करत आहेत. दरम्यान, बेकायदेशीर जमाव जमवून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
