सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वरनगर (बारामती) येथील सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, सोमेश्वनरनगर च्या शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅन्ड टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरींग विभामध्ये कार्यरत असलेल्या प्रा. स्मिता पाटील यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पी.एच.डी. प्रदान केली आहे.
प्रा.स्मिता पाटील यांनी "इन्व्हेस्टीगेशन ऑन जीओपॉलीमर काँक्रीट फॉर रिजीड पेव्हमेंट" या विषयावर पिंपरी (पुणे) येथील डी. वाय. पाटील रीसर्च सेंटर (इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी) येथे संशोधन केले आहे. यासाठी त्यांना स्कुल ऑफ इंजिनिअरींग अजिंक्य डी. वाय. पाटील, पुणे येथील सिव्हिल इंजिनिअरींग विभागाच्या प्रोफेसर डॉ. दिपा ए. जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. सदर संशोधनासाठी त्यांना मंगला इकोमिक्स इनोव्हेशन प्रा.लि. फरीदाबाद (दिल्ली) चे दिपांशू मंगला व व्ही. एच. खत्री कन्स्ट्रक्शन, बारामती यांचे सहकार्य लाभले.
तसेच प्रा.स्मिता पाटील यांनी त्यांच्या संशोधन विषयावर चार शोधनिबंध प्रसिद्ध केले असुन एक पेटंट प्राप्त केलेले आहे शिवाय एक कॉपीराईट केलेले आहे. सिमेंट विरहित, पर्यावरणपुरक रस्ते तयार करण्यासाठी सदर संशोधन उपयुक्त ठरणार आहे. तसेच या संशोधन कामी शरदचंद्र पवार अभियात्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय देवकर, उपप्राचार्य डॉ. शरद गावडे, विभाग प्रमुख व सहकाऱ्यांची मदत झाली. प्रा. स्मिता पाटील यांच्या या यशाबद्दल श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप, व्हाईस चेअरमन मिलींद कांबळे, संचालक प्रतिनिधी आनंदकुमार होळकर, संस्थेचे सचिव भारत खोमणे व सर्व संचालक मंडळाने अभिनंदन केले.
