सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
करंजेपूल ता. बारामती येथील फकरुद्दीन समशेर मुलाणी वय ८१ वर्ष यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांचे मागे पत्नी,तीन विवाहीत मुले नातवंडे असा परिवार आहे. आरोग्य खात्यातील फिरोज मुलानी परवेझ मुलानी व समीर मुलानी यांचे ते वडील होते.
सलग ३५ वर्ष महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये विना अपघात चालक म्हणून त्यांचा गौरव झाला होता. आज दुपारी दीड वाजता करंजे ता. बारामती येथे त्यांचा दफनविधी करणेत येणार आहे .
