Jawali News l मेढा नगरपंचायतीच्या विषय समितीच्या सभापतीपदाच्या निवडी बिनविरोध

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : सोमनाथ साखरे 
सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्हा पालकमंत्री ना.श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे वर्चस्व असलेल्या मेढा नगरपंचायतीच्या विषय समितींच्या सभापती पदाच्या निवडी बिनविरोध करण्यात आल्या.
                यावेळी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले आदेशानुसार स्थायी समिती सभापती नगराध्यक्षा सौ रुपालीताई वारागडे, पाणीपुरवठा व जलनिस्सारण सभापती पदी उपनगराध्यक्ष विकास देशपांडे, बांधकाम नियोजन विकास सभापती पदी शिवाजीराव देशमुख, आरोग्य, स्वच्छता, शिक्षण सभापती पदी नितीन मगरे,महिला बालकल्याण सभापती श्रीमती आनंदी करंजेकर तर उपसभापती पुष्पा मुकणे यांच्या निवडी करण्यात आल्या असल्याचे मुख्याधिकारी अजिंक्य पाटील यांनी सांगीतले.
        विविध विषय समित्यांचे सदस्य पदी पूढील प्रमाणे सदस्य घेण्यात आले आहेत. स्थायी समितीमध्ये सदस्य पदी - पांडुरंग देशपांडे,(उपनगराध्यक्ष तथा सभापति पाणी पुरवठा ),नितीन मगरे ( सभापती - स्वच्छता वैद्यकिय व सार्वजनिक आरोग्य ), शिवाजी देशमुख ( सभापती नियोजन आणि विकास ), श्रीमती आनंदी करंजेकर ( सभापती - महिला व बालकल्याण).यांची निवड करण्यात आली..
        तसेच नियोजन आणि विकास समिती (बांधकाम ) समितीमध्ये सदस्य म्हणून सुशांत कांबळे, हरिशचंद्र तिवाटणे, रणधीर गोरे, यांची निवड करण्यात आली तर 
स्वच्छता, वैद्यकिय व सार्वजनिक आरोग्य समितीमध्ये सदस्य  शिवाजी गोरे, सुनिता तांबे, मोनिका जवळ यांना सदस्य म्हणून घेण्यात आले आहे आणि पाणीपुरवठा व जलनिसःरण समिती मध्ये तेजस्वीनी इगावे, धनंजय पवार, शर्वरी गायकवाड सदस्य म्हणून घेण्यात आले आहे.
          तसेच महिला व बालकल्याण समितीमध्ये छकुली देशमुख, सोनाली पवार यांच्या निवडी पक्षीय पातळीवर संख्येनुसार करण्यात आल्या. याप्रसंगी सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या.
        पीठासन अधिकारी तथा मुख्याधिकारी अजिंक्य पाटील यांनी मेढा नगरपंचायतीची विशेष सभा सोमवार दि..२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वा. नगरपंचायतीच्या कार्यालयात आयोजीत केली होती. सर्व नुतन सभापती व समितीचे सदस्य यांचे ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी उपाध्यक्ष जि.प. सातारा वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.
To Top